Home राजकारण पदवीधर निवडणुकीसाठी आ. वैभव नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

पदवीधर निवडणुकीसाठी आ. वैभव नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

120

सिंधुदुर्ग: कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान आज होत असून कणकवली तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रावर कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला.महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास यावेळी आ. वैभव नाईक यांनी व्यक्त केला. तसेच कणकवली, आचरा, मालवण कट्टा, कुडाळ व माणगाव येथील महाविकास आघाडीच्या बुथवर आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला.