एक दिव्यांगच दिव्यांगांचे दुःख जाणू शकतो…! विनोद धुरी.
सावंतवाडी: दिव्यांग डिमेलो भगिनींवर ओडावलेल्या परिस्थितीबाबत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने केलेल्या आव्हान बाबतची बातमी सोशल मीडिया व वृत्तपत्रात वाचून अवघ्या दोन दिवसातच एका काळसे गावातील अतिशय गरीब कुटुंबातील विनोद धुरी हे काळसे पंचक्रोशी अपंग संस्थेचे अध्यक्ष आहेत होते स्वतः दिव्यांग असून त्यांना चालता येत नाही परंतु दिव्यांग भगिनींच्या मदतीसाठी काळसे गावावरून ते सहकाऱ्यांच्या मदतीने सावंतवाडी येथे येऊन त्या तीन दिव्यांग भगिनींना भेट देऊन जवळपास दोन महिने पुरेल अशा जिवाणूशक वस्तू दिल्या. हे चित्र मन हेलावणार होतं अतिशय गरीब कुटुंबातील असून सुद्धा ज्याला चालता पण येत नाही अशा दिव्यांग व्यक्तीने ते अनमोल दान दिले आहे. त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा माझी मदत लागेल त्यावेळी तुम्ही मला कळवा मी आपल्याला अवश्य मदत करेन असेहि आश्वासन दिले. त्याचप्रमाणे त्यांच्या घरात अंथरूण- पांघरून नाही हे पाहून त्या दिव्यांग भगिनींसाठी तीन गाद्या, बेडशीट, चटई व कपडे येत्या आठ दिवसात देईन असेही आश्वासन दिले. त्यावर ते म्हणाले दिव्यांग्याचं व्यक्ती दिवांग्यांच्या वेदना जाणू शकतो. सदर माझी संस्था दिव्यांगाने दिव्यांगांसाठी चालवलेली एक संस्था आहे.ते पुढे म्हणाले अकरा वर्ष आपण दिव्यांगांसाठी जीव तोडून काम करतो त्यासाठी मला माझे सहकारी दिव्यांग मित्र अनिल पाटील ,विनायक चव्हाण, उर्मिला चव्हाण व निलेश हडकर यांचे मला नेहमीच मोलाचे सहकार्य लाभते यापुढे देखील आम्ही अशाच प्रकारे मदत करू असे ते म्हणाले.
याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, सचिव समीरा खलील, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर ,रवी जाधव ,रूपा मुद्राळे व रमिजा दुर्वेश,उपस्थित होत्या. सामाजिक बांधिलकीचे उपाध्यक्ष शैलेश नाईक यांनी विनोद धुरी यांचे आभार मानले.