Home स्टोरी अभिजित जाधव यांना लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार जाहीर.

अभिजित जाधव यांना लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार जाहीर.

319

शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीचा होणार गौरव.

 

सावंतवाडी प्रतिनिधी: अविष्कार सोशियल अँड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार” कलंबिस्त , तालुका सावंतवाडी येथील कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्त या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अभिजित जाधव सर यांना जाहीर झाला आहे.

फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना प्रतिवर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय पवार यांनी पुरस्कारासाठी निवडीचे पत्र दिले आहे. श्री.अभिजित जाधव सर हे गेली 20 वर्षे कलंबिस्त हायस्कूल मध्ये इंग्रजी विषयाचे अध्यापन करत असून ते नेव्हल NCC ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.गेली 03 वर्षे ते मुख्याध्यापक म्हणून उत्तमरीत्या सेवा बजावत आहेत. मुख्याध्यापक ह्या पदी कार्यरत असताना सरांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील एक उपक्रमशील शाळा म्हणून आज कलंबिस्त हायस्कूलने आपली ओळख निर्माण केली आहे. याचं श्रेय निश्चितच मुख्याध्यापक जाधव सर व त्यांच्या टीमला जाते. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेली असून ते, सावंतवाडी तालुका मुख्याध्यापक संघाचे तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सचिव म्हणून काम पाहतात.

श्री अभिजित जाधव यांचे शालेय शिक्षण कणकवली तालुक्यात झाले असून त्यांना या पूर्वी “कोकणसाद”चा ‘गुरुगौरव पुरस्कार’ व कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा ‘गुणवंत कर्मचारी’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. या यशाबद्दल श्री.जाधव सर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार ३० जून रोजी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक सभागृहात होणार आहे.