मसुरे प्रतिनिधी: सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचा बिळवस ग्रामस्थांतर्फे खासदार म्हणून निवडून आल्या बद्दल मुंबई- नरिमन पॉईंट कार्यालयात भेट घेत सत्कार करण्यात आला. यावेळी वार्षिक जत्रोत्सवास आई सातेरी मातेचे आशीर्वाद घेण्यास आपण येणार असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले. तसेच बिळवस गावातील उर्वरित विकास कामांची यादी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली. यावेळी प्रशांत (भाई) पालव, सिताराम सदाशिव सावंत, वैभव पालव, सुभाष पालव, चंद्रशेखर पालव, सचिन जीवबा पालव आदी उपस्थित होते.