Home स्टोरी मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबोली येथे १००० वृक्षारोपणाचा शुभारंभ.

मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबोली येथे १००० वृक्षारोपणाचा शुभारंभ.

96

सावंतवाडी: मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या वतीने आंबोली येथे सुमारे १००० हजार जंगली झाडे लावण्याच्या मोहिमेचा शुभारंभ मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. आंबोली ग्रामस्थांच्या सहकार्याने हि मोहीम हाती घेण्यात आली असून येत्या ८ दिवसात हि झाडे जंगलमय परिसरात लावण्यात येणार आहेत. आंबोली सारख्या भरपूर वनसंपदा लाभलेल्या गावात अलीकडे सिमेंट संस्कृती उदयास आली असून जंगले नाश पावत आहेत. हि जंगले टिकली पाहिजेत तर मोठ्या प्रमाणात नवीन जंगली झाडांची लागवड करावी लागणार आहे व याचीच जाणीव ठेवून हि नवीन जंगलीझाडे लावण्याची मोहीम मनसेतर्फे हाती घेण्यात आलेली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सनी बागकर, परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष. केतन सावंत, बांदा शहर अध्यक्ष. चिन्मय नाडकर्णी, सुनील आसवेकर, अतुल केसरकर, विनायक फटनाईक, सतीश आकेरकर, प्रथमेश गावडे, काशीराम गावडे, महादेव तांडेल, रोहित सावंत, निलेश गावडे, सिद्देश आकेरकर, रामचंद्र अम्रुस्कर, दिलीप गावडे, प्रज्योत पेंडसे, गौतम नाटलेकर, संतोष नाटलेकर, वसंत गावडे, वैभव गावडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.