Home स्टोरी ‘शिवसंस्कार’तर्फे भव्य आंतरराज्य दुर्ग फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन.       

‘शिवसंस्कार’तर्फे भव्य आंतरराज्य दुर्ग फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन.       

114

सावंतवाडी: छत्रपती शिवरायांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा शक पूर्ण होऊन ३५१ वे शक प्रारंभ होत आहे. दुर्गदुर्गेश्वर रायगडावर दि. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला दि.२० जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलेल्या दूरदृष्टीचं द्योतक म्हणजे गड किल्ले!!ज्याच्या ताब्यात गड त्याची त्या प्रदेशावर सत्ता हे मर्म ओळखूनच महाराजांनी गडावर राहूनच स्वराज्य उभारणी , स्वराज्य विस्तार केला आणि दैदिप्यमान राज्याभिषेकही रायगडावरच सम्पन्न झाला. समुद्री वर्चस्व स्थापन करण्यासाठी सिंधुदुर्ग सारखा जलदुर्ग बांधला. म्हणूनच शिवसंस्कारांचे जतन आणि शिवविचारांचे मंथन करणाऱ्या ‘शिवसंस्कार ‘तर्फे यावर्षी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व गुजरात या चारही राज्यामध्ये भव्य दुर्ग फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. स्पर्धकाने केवळ स्वतः काढलेलेच फोटो पाठवायचे आहेत. स्पर्धेसाठी एक स्पर्धक कमीत कमी एक व जास्तीत जास्त तीन फोटो पाठवू शकतो. आपले नाव,संपूर्ण पत्ता असलेले फोल्डर बनवून त्यामध्ये आपले फोटो पाठवायचे आहेत. कोणत्याही किल्ल्याचा फोटो स्पर्धक पाठवू शकतात.स्पर्धा ऑनलाइन असल्याने फोटो शिवसंस्कारच्या अधिकृत नंबरवर 9607827296 दिनांक ५जुलै पर्यंत पाठवायचे आहेत.स्पर्धेची फी रु शंभर शिवसंस्कारच्या नंबरवर पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे.

राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन शिवसंस्कारच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. विजेत्या छायाचित्रकाराना वार्षिक भव्य सन्मान सोहळ्यात महत्वाच्या सन्माननीय अतिथींच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.