पिंपरी चिंचवड: साटेली भेडशी येथील स्वामी समर्थ मेडिकल स्टोअर्सचे मालक तथा युवा उद्योजक राजदत्त शेखर वेटे यांना त्यांच्या औषध व्यवसायाच्या अल्पावधीतील सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना टायकुन्स ऑफ एशिया या संस्थेचा महाउद्योजक रत्नदिप पुरस्कार प्रदान करण्यात आला. पिंपरी चिंचवड येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सायली संजीव यांच्याहस्ते राजदत्त वेटे यांना हा महाउद्योजक रत्नदिप पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राजदत्त वेटे यांचे वडील कै शेखर वेटे यानीही १९८६ पासून त्यावेळी साटेली भेडशी सारख्या ग्रामीण भागात तीन दशके दिवसरात्र कष्टाने, प्रामाणिकपणे, सचोटीने व निस्वार्थपणे काम करीत ग्राहकांना चांगली सेवा दिली. त्यानंतर औषध व्यवसायातील बी फार्म पदवी प्राप्त केलेल्या राजदत्त वेटे यानेही आपल्या वडिलांच्या पश्चात आपली आई संगीता यांना साथ देत ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिली. कोरोना काळातही स्वतःचा जीव धोक्यात घालून राजदत्त वेटे याने जनतेला औषधे उपलब्ध करून दिली.
फार्मासिस्ट वर्ग हा सामाजिक आरोग्य व्यवस्थेचा एक महत्वाचा घटक असून सामाजिक बांधिलकी जपून राजदत्त वेटे याने ग्राहकांना प्रामाणिकपणे व सातत्यपूर्ण ग सेवा देत आहे. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देताना जोखीम पत्करून देऊन रात्री-अपरात्री अविरत अखंड सेवा बजावत आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत राजदत्त वेटे याना टायकुन्स ऑफ एशिया या संस्थेचा महाउद्योजक रत्नदिप पुरस्कार प्रदान करण्यात आला.