Home स्टोरी दोडामार्ग तालुक्यातील पडवे माजगाव इको सेन्सिटिव्ह झोनमधील लोह खनिज उत्खनन विरोधात माजी...

दोडामार्ग तालुक्यातील पडवे माजगाव इको सेन्सिटिव्ह झोनमधील लोह खनिज उत्खनन विरोधात माजी मा. आमदार उपरकर आक्रमक

107

सिंधुदुर्ग: माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा खणीकर्म अधिकारी यांना पडवे माजगाव येथे होत असलेल्या लोह खनिज उत्खनन व झालेल्या वाहतुकीबाबत निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात माहिती अधिकारी अधिनियम २००५ अन्वये सुनावणी झाल्यानंतर आपणाकडे दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील पडवे माजगाव येथील सर्वे नंबर २५/३ मध्ये लोहखनिजाचे हजार ते दीड हजार डंपर उत्खननाबाबत ओरोस येते तोंडी तक्रार केली होती. त्या ठिकाणी तहसीलदार प्रांत यांनी दुर्लक्ष केले असल्याबाबत सांगितले असता प्रांत कार्यालय सावंतवाडी यांनी भ्रमणध्वरीवरून सदर आपल्याशी हकीकत सांगितली होती. त्यावेळी दंड वसूल करणार असे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर सांगण्यात आले होते.

माजी आमदार उपरकर  यांनी सांगितलं की, वरील तक्रारीबाबत तहसीलदार प्रांत यांना तक्रारीचे पत्र देऊन स्वतः मी तहसीलदार सावंतवाडी यांना भेटलो असता त्यांनी दंड वसुलीचे काम करणे हे जिल्हा खणीकर्म अधिकारी यांचे आहे. त्याकरिता लोह खनिजाचा पाचपट दंड लावणे हे त्यांच्या अधिकारात येतं. असे सांगून आपणाकडील जबाबदारी जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणून आपल्याकडे टाकलेली आहे. त्यामुळे सदर देत असलेल्या तक्रारी वरती इको सेन्सिटिव्ह झोन असलेल्या लोह खनिजाचे उत्खनन तक्रारीची आपण चौकशी करावी व योग्य ती कारवाई करावी.

पडवे माजगाव हे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये सरू असलेले लोह खनिज उत्खनन

पडवे माजगाव हे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येणारे गाव असून सर्वे नंबर २५/३ मधील मोठ्या प्रमाणात लोह खनिज उत्खनन करून सुमारे १००० ते १५०० डंपर वाहतूक दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव येथे गावा डम्प केली होती सदर डम्प तहसीलदार यांच्या म्हणण्यानुसार ट्रेडिंग लायसन्स धारकाने दोडामार्ग येथे उचलून रेडी पोर्ट वरती वाहतूक केली आहे सदर वाहतुकीबाबत कोणत्या वाहतूक ट्रेडरचे पास वापरले त्याची चौकशी करून माहिती घ्यावी व त्या वाहतूक पास द्वारे त्यांनी विना वाहतूक पास मोठ्या प्रमाणात वाहतूक करून १००० ते १५०० डंपर रेडी पोर्ट वर टाकले असे तहसीलदार यांनी चर्चेतून सांगितले व त्यावर सदर दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव येथील खनिज डम्प केले त्या ठिकाणी तात्पुरती बिनशेती झाली आहे की नाही याची तपासणी करावी व त्या ठिकाणी जे रॉयल मिनरल रिसोर्सेस पीजीएम लायसन्सने TDR000862 IBMmNo IBM/45209/2022 यांनी सदर लोहखनिज रेडी पोर्टल नेले ते कोणत्या पासद्वारे व सदर कंपनीचा परवाना दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव या गावातून लोह खनिज वाहतूक करण्यासाठी दिला होता काय? याची चौकशी करून दंडाची कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी माजी मा. आमदार उपरकर यांनी केली आहे.

लोह खनिज वाहतूक करणाऱ्या गाड्या