Home स्टोरी सकल मराठा समाज सावंतवाडीचा दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ९ जून रोजी…!...

सकल मराठा समाज सावंतवाडीचा दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ९ जून रोजी…! सिताराम गावडे

84

माजी खासदार डॉ निलेश राणे, युवराज लखम राजे भोसले,भोसले नाॅलेज सीटी चे संस्थापक अध्यक्ष अच्यूत भोसले, युवा नेते उद्योजक विशाल परब, प्रांताधिकारी हेमंत निकम राहणार उपस्थित.

महादेव भाटले शिल्पग्राम शेजारी असलेल्या यशवंतराव भोसले इंटर नॅशनल स्कूल च्या सभागृहात होणार सत्काराचा कार्यक्रम

 

सावंतवाडी: सकल मराठा समाज सावंतवाडी च्या वतीने दहावी बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी दिनांक ९ जून रोजी यशवंतराव भोसले इंटर नॅशनल स्कूल च्या सभागृहात महादेव भाटले शिल्पग्राम शेजारी सावंतवाडी येथे संध्याकाळी ठीक ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी नाव नोंदणी केलेल्या व ज्यांना नाव नोंदणी करने शक्य झाले नाही त्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष सीताराम गावडे, उपाध्यक्ष लक्ष्मण नाईक, सेक्रेटरी -आकाश मिसार, खजिनदार समीर पाटकर,यांनी केले आहे.

रविवार दिनांक ९ जून रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार असून जिल्हाभरातून विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद देत आपली नाव नोंदणी केली आहे,या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉक्टर निलेश राणे,युवा नेते उद्योजक विशाल परब, सावंतवाडी संस्थान चे युवराज लखम राजे भोसले,भोसले नाॅलेज सीटी चे संस्थापक अध्यक्ष अच्यूत भोसले, प्रांताधिकारी हेमंत निकम उपस्थित राहणार आहेत.

कणकवली,देवगड,मालवण, वेंगुर्ला, कुडाळ, दोडामार्ग, येथून आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रथम सत्कार करण्यात येणार आहे,शाल श्रीफळ, सन्मान पत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.तरी जास्तीत जास्त गुणवत विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.