सावंतवाडी: वरिष्ठ नेत्यांनी मला आमदारकीच्या तयारी लागण्याच्या सूचना दिल्याने आगामी विधानसभा निवडूक मी लढवणार आहे. सावंतवाडी मतदारसंघात बाहेरच्या लोकांना स्थान नाही. असे सांगून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी माजी आमदार राजन तेली यांना नाव न घेता इशारा दिला आहे. कणकवली, मुंबई, पुणे, कुडाळातील ‘पर्यटक’ उमेदवार इथे चालणार नाही असा दावा करीत त्यांनी राजन तेली, विशाल परब, अर्चना घारे, शैलेश परब या विधानसभेच्या इच्छुक उमेदवाराना एक प्रकारचा इशारा दिला आहे.
ते म्हणाले, आगामी विधानसभा निवडूक मी लढवणार आहे. सावंतवाडी मतदारसंघात बाहेरच्या लोकांना स्थान नाही. त्यामुळे मी या ठिकाणांहून पक्षाकडे उमेदवारी मागून तिकीट मिळाल्यास जिंकून येणार आहे. येथे पर्यटक उमेदवार इथे चालणार नाही. लोकांच्या २४ घंटे सोबत असणारा स्थानिक उमेदवार येथे चालतो,
सावंतवाडी शहरात महायुतीला मिळालेले मताधिक्य अनपेक्षित आहे. दीपक केसरकर व भाजप एकत्र असताना मोठ्या मताधिक्याची अपेक्षित होत. परंतु, अल्पसंख्याक व दलित समाज यांची साथ भाजपला मिळाली नाही. २० पैकी ४ बुथवरच विरोधकांना मताधिक्य मिळाले. असे मत श्री.परब यांनी व्यक्त केले. भविष्यात हे मताधिक्य वाढलेले दिसेल असा दावा संजू परब यांनी केला. यावेळी माजी सभापती संदीप नेमळेकर, गोविंद कैरकर आदी उपस्थित होते.







