Home शिक्षण हुशार मुलानी राजकारणात वळावे..! माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

हुशार मुलानी राजकारणात वळावे..! माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

107

सावंतवाडी प्रतिनिधी: हुशार मुलानी राजकारणात वळावे. आज चांगली हुशार मुले राजकारणात आवश्यक आहेत तरच भविष्यात आपला देश आणि राज्य एक चांगल्या विचाराचे तयार होईल. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांनी अनेक वाटा शोधताना भविष्यात राजकारणातही आपण जाऊ या दृष्टीने विचार करावा. आज सगळेच जण पदवी प्राप्त होतात आणि इंजिनिअर डॉक्टर वकील या क्षेत्राकडे वळतात पण राजकारणही असे क्षेत्र आहे ते सर्व क्षेत्राचे अंगभूत आहे आणि या क्षेत्राकडे हुशार मुलानी जायला हवे. असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी गवळी तिठा येथील राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने सावंतवाडी शहरातील सर्व शाळातील इयत्ता दहावी च्या प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

सावंतवाडी येथील वैश्य भवन मध्ये झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर वैश्य भवन मंडळाचे प्रमुख रमेश बोंद्रे, बाळासाहेब बोर्डेकर, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे तालुकाध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत, सकल मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष, सिताराम गावडे, सावंतवाडी तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, राजा शिवाजी चौक मित्र मंडळ अध्यक्ष बंटी माटेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, पत्रकार प्रा. रुपेश पाटील, उपाध्यक्ष बंड्या तोरसेकर, दिलीप पवार, उपाध्यक्ष अरुण घाडी, सचिव दीपक सावंत, सहसचिव महादेव राऊळ, संजय साळगावकर, तुकाराम कासार, गोविंद सावंत, उदय भराडी, पप्पी मिस्त्री, सुनील गावडे, संतोष राऊळ, चिनू खानोलकर, मुकेश पटेल, रोहित पांडे, सुधाकर चव्हाण, आयाश शेख, श्री पडते, संजय बीरोडकर, सुंदर गावडे, महेश नार्वेकर, एस टी महामंडळाचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक श्री वाडकर, महेश परुळेकर आधी उपस्थित होते.

यावेळी दहावी परीक्षेत यश मिळवलेल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थी व पालकांचा शाल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कोकण मराठी साहित्य परिषदचे तालुकाध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत व रमेश बोंद्रे, हरिश्चंद्र पवार, सिताराम गावडे, रुपेश पाटील, श्री वाडकर बोलताना म्हणाले दहावी व बारावीत तुम्ही चांगले गुण मिळवलात. परंतु आता पुढील काळा हा तुमचा महत्त्वाचा आहे. अनेक स्पर्धा परीक्षा तसेच नीट, जेइ, सीइटी आधी मध्ये तुम्हाला चांगले गुण मिळायला हवेत. त्यासाठी फार मेहनत करणे आवश्यक आहे. गुरुजन आणि आई-वडिलांचा सन्मान करा. यशाच्या पाऊलवाटा निवडताना तुम्ही ध्येय आणि चिकाटीकडे फार महत्त्व द्या तरच यश पुढील जीवनात तुम्हाला प्राप्त होईल. अनेक स्पर्धा परीक्षा आहेत. त्याचा अभ्यास करा असे स्पष्ट केले. यावेळी सूत्रसंचालन सिताराम गावडे तर आभार सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव यांनी मानले.