Home स्टोरी माझा बाप बिल्डर असता तर…’या विषयावर पुण्यात निबंध स्पर्धा.

माझा बाप बिल्डर असता तर…’या विषयावर पुण्यात निबंध स्पर्धा.

115

पुणे: पुण्यातील हिट अँड रनचे प्रकरण खूप गाजत आहे. पुण्यात एका अल्पवीयन मुलाने दोन जणांना आपल्या महागड्या गाडीने (पोर्शे) उडवले. त्यात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. एका बिल्डरच्या मुलाने दोघांना उडवले त्यांचा त्यात दुर्दैवी अंत झाला, तरीही अल्पवयीन मुलाला केवळ निबंध लिहिण्यास सांगून सोडण्यात आले होते. याप्रकरणी दोन पोलिसांचे निलंबनही केले गेले. यावरुन जनमानसात असंतोष उसळला. आता या प्रकरणावर उपरोधिकपणे भाष्य करण्यासाठी भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन केले आहे. ११ हजार १११ रुपयांचा पहिले बक्षिसही ठेवण्यात आले आहे.

निबंधाचे विषय खालीलप्रमाणे आहेत-          माझा आवडती कार ( पोर्शे, फरारी, मर्सिडीज) दारुचे दुष्परिणाम, माझा बाप बिल्डर असता तर?, मी खरंच पोलीस अधिकारी झालो तर?, अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण? आमदार रविंद्र धंगेकरांच्या हस्ते जिंकलेल्या उमेदवाराला बक्षीस वितरण. वयोमर्यादा १७ वर्षे ते ६८ वर्ष, आज रविवारी सकाळी स्पर्धेचे आयोजन. स्थळ: अपघात स्थळी, बॉलर पबसमोर, कल्याणीनगर