Home स्टोरी मसुरे गावठणवाडी येथे २० मे रोजी दशावतार नाट्यप्रयोग!

मसुरे गावठणवाडी येथे २० मे रोजी दशावतार नाट्यप्रयोग!

285

मसुरे प्रतिनिधी:  गावठणवाडी येथील श्री समर्थ अवधुत महाराज यांच्या समाधी मंदीराचा कलशारोहण व्दितीय वर्धापनदिन सोहळा २० मे रोजी आयोजित केला आहे. यानिमित्त सकाळी ९.०० ते ११.०० वा. धार्मिक विधी, दुपारी १२.०० वा. महाआरती, दुपारी १.०० ते ३.०० वा. महाप्रसाद, सायं. ७.०० ते ९.०० वा. भजन, रात्रौ ९.३० वा. श्री विघ्नहर्ता रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ, निगुडे यांचा ‘शिव अघोरी संग्राम’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन समस्त मसुरे देऊळवाडा ग्रामस्थ, गावठणवाडी व अवधुत महाराज भक्तजन यांनी केले आहे.