Home स्टोरी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात सकाळी ७ पासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी केली मतदान करण्यासाठी...

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात सकाळी ७ पासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी केली मतदान करण्यासाठी गर्दी

105

सावंतवाडी: लोकसभा निवडणुक २०२४ मतदानाला सुरूवात झाली असून राज्यातील मतदानाचा तिसरा टप्पा पार पडत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात सकाळी ७ पासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानास गर्दी केली होती. सावंतवाडीच्या राजघराण्याकडून देखील सहकुटुंब मतदानाचा हक्क बजाविण्यात आला.

लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी सर्व नागरिकांना मतदान कराव असं आवाहन यावेळी राजघराण्याकडून करण्यात आलं. याप्रसंगी राजेसाहेब खेमसावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, राजकन्या उर्वशीराजे भोंसले आदी उपस्थित होते.

 

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सकाळीच सावंतवाडी शहरातील मतदान केंद्रावर जात आपला मतदानाचा हक्क बजावला. ना. दीपक केसरकर यांच्या सुविद्य पत्नी माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर यांच्यासह मुलगी यांनी देखील मतदान केले. विकसित भारतासाठी मतदार उत्स्फूर्तपणे मतदान करीत आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.