Home स्टोरी मसुरे स्वामी समर्थ मठाचा २६ पासून वर्धापनदिन सोहळा!

मसुरे स्वामी समर्थ मठाचा २६ पासून वर्धापनदिन सोहळा!

101

मसुरे प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थ मठ मसुरे मर्डेवाडी च्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त २६ एप्रिल पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सग्रह श्री स्वामी समर्थ दत्तमालामंत्र याग होणार आहे. २६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी १.३० वा प्रायश्चित्त, मंगलचरण, गणेशपूजन,पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राध्द, आचार्यपूजन,देवतास्थापना, अग्निस्थापना, ग्रहस्थापना, ग्रहयज्ञ, लघुपूर्णाहुती, आरती श्री स्वामी समर्थ दत्तमालामंत्र जप, दुपारी १.३० ते ३ महाप्रसाद, सायं. ५ वा. श्री स्वामी समर्थ पालखीची नगर प्रदक्षिणा.२७ एप्रिल रोजीसकाळी ८ ते दुपारी १.३० वा मंगलाचरण, प्राकारशुध्दी, स्थापितदेवता पूजन, बलिदान, श्री स्वामी समर्थ दत्तमालामंत्रहवन, पूर्णाहुती अभिषेक, आरती,दुपारी १.३० ते ३ महाप्रसाद, सायं. ५ वा. श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. उपस्थिती चे आवाहन स्वामी समर्थ मठ मसुरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.