२० एप्रिल वार्ता: राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा अधिकच तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यासंबंधी काही सवलत दिली आहे. याबाबत एक आदेश हि काढण्यात आला आहे. शाळांचे काही महत्त्वाचे उपक्रम सुरू असल्यास तापमानाचा अंदाज घेऊनच संबंधित शाळांनी निर्णय घ्यावा, असे या आदेशात नमूद आहे.
राज्यात काही दिवसांपासून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिली आहे. तर दुसरीकडे, शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांना (शालेय पोषण आहारास पात्र) कोरडा शिधा म्हणजेच तांदूळ व धान्यादी माल दिला जाणार आहे. तो कसा वाटायचा, यासंबंधी राज्य स्तरावरून स्वतंत्र बैठक घेऊन नियोजन निश्चित होईल.