Home स्टोरी काजूला शासनाच्या दहा रुपये अनुदानासह १३० रुपये दर मिळणार.

काजूला शासनाच्या दहा रुपये अनुदानासह १३० रुपये दर मिळणार.

106

मंत्री दीपक केसरकर व जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या उपस्थितीत बैठकीत निर्णय.

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही काजूदरावरून निर्माण झालेला वाद अखेर शमला असून काजूला शासनाच्या दहा रुपये अनुदानासह १३० रुपये दर देण्यात येणार आहे. तसा निर्णय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत शेतकरी व कारखानदार यांच्यामध्ये ठरला. त्यानंतर या वर्षासाठी या दराशी आम्ही समाधानी असल्याचे सिंधुदुर्ग शेतकरी फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी सांगितले. दरम्यान, शासनाकडून देण्यात येणारे दहा रुपये हे अनुदान आचारसंहितेनंतर देण्यात येणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.

सिंधुदुर्गातील काजू बिला स्वामीनाथन आयोगाच्या धर्तीवर १९७ रुपये दर मिळावा अशी मागणी सिंधुदुर्ग शेतकरी व फळबागातदार संघाच्या वतीने लावून धरण्यात आली होती. गेली काही वर्ष काजू बिला योग्य दर मिळत नसल्याने बागायतदारांनी ही मागणी केली होती. मात्र, याबाबत काहीच तडजोड होत नसल्याने काजू बागायतदार शेतकरी गेले कित्येक दिवस नाराज होते. त्यांनी या संदर्भात आक्रमक भूमिका हाती घेतली होती.

या पार्श्वभूमीवर दराबाबतचा निर्माण झालेला हा तिढा सोडवण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुढाकार घेतला. शिवाय शासनाकडूनही काजू बीला दहा रुपये दरामागे अनुदान देण्याचे जाहीर केले. मात्र, या संदर्भात ठोस निर्णय झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी फळबागायतदार संघामध्ये नाराजी कायम होती.

त्यामुळे शेतकरी व फळबागायतदार संघ व कारखानदार यांची बैठक मंत्री केसरकर यांनी आज सावंतवाडीत बोलावले होते या बैठकीमध्ये काजू बागायतदार यांची नाराजी दूर करत त्यांना शासनाचे अनुदान मिळून १३० रुपये दर देण्याचे निश्चित करण्यात आले.

यासंदर्भात माहिती देताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारखानदारांकडून शेतकऱ्यांची काजू बी खरेदी करताना बाजारपेठेत ११० रुपये दर असलेला काजू ११५ रुपये तर ११५ रुपये दर असलेला काजू १२० रुपये आले विकत घेण्याचे मान्य केले. या दरामागे शासनाकडून मिळण्यात येणारे दहा रुपयांचे अनुदानही देण्यात येणार आहे त्यामुळे ११५ रुपयाच्या रुपयांच्या काजूला १२० रुपये तर १२० रुपयाच्या काजुला १३० रुपये दर मिळणार आहे. हा दर उद्यापासून काजू बागायतदारांना देण्यात येईल तर शासनाकडून जाहीर करण्यात आलेले अनुदान आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांना देण्यात येईल असे स्पष्ट केले. त्यानंतर बैठकीत झालेला निर्णय आणि जर आम्हाला मान्य असल्याचे सिंधुदुर्ग शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विनायक सावंत यांनी सांगितले.

या बैठकीला कारखानदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, बिपिन वरस्कर, जनार्दन नाईक आदी उपस्थित होते.