Home स्टोरी मॉरिशसमध्ये स्थायिक व मूळ भारतीय मराठी प्रेमी बांधव यांचे सिंधुर्गात जिल्ह्यात होणार...

मॉरिशसमध्ये स्थायिक व मूळ भारतीय मराठी प्रेमी बांधव यांचे सिंधुर्गात जिल्ह्यात होणार आगमन.

193

कुडाळ प्रतिनिधी: मॉरिशसमध्ये स्थायिक व मूळ भारतीय मराठी प्रेमी बांधव यांचे मॉरिशस मधून १४ एप्रिलला सिंधुर्गात आगमन होणार असून मॉरिशसयेणाऱ्या या मराठी प्रेमी बांधवांचे कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. मॉरिशस होऊन येणाऱ्या मराठी बांधव हे आपली कलाविष्कार सादर करणार आहेत. महाराष्ट्रात पाच ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होणार आहेत. भारतीय संस्कृतीवर व मराठी परंपरेवर आधारित विशेष कलाविष्कार ते सादर करणार आहेत. मॉरिशस मधून येणाऱ्या या टीमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलेच आगमन आहे. त्यामुळे त्यांचे कोकणी व सिंधुदुर्ग पद्धतीने त्यांचा सन्मान गौरव केला जाणार आहे. यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने खास स्वागत समिती ही गठीत करण्यात आली आहे. अशी माहिती कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी दिली. कुडाळ येथे या मॉरिशस टीमचे भव्य स्वागत व कार्यक्रम नियोजनासाठी जिल्हा कार्य करण्याची बैठक जिल्हा ग्रंथालय येथे झाली.

यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा व भव्य दिव्य स्वागत चर्चाही करण्यात आली. यावेळी मॉरिशस च्या कलाविष्कार टीमचे स्वागत करण्यासाठी समितीचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के यांच्या वतीने रुजा रिओ पिंटो, संदीप वालावलकर, चिराग बांदेकर, भरत गावडे, विठ्ठल कदम, सुरेश ठाकूर, एडवोकेट संतोष सावंत, वृंदा कांबळी हे पदाधिकारी करणार असून यावेळी कसाल येथील कार्यक्रमात सायंकाळी आठ वाजता श्रीदेवी पावणाई रवळनाथ मंदिराच्या रंगमंचावर मॉरिशस च्या टीमचे कलाविष्कार कार्यक्रम होणार आहे. यावेळी त्यांचा सत्कार केला जाणार आहे.

अलीकडेच भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या प्रेरणेतून कोमसापचे साहित्य संमेलन मॉरिशस मध्ये संपन्न झाले. यावेळी कोमसापच्या मार्फत अनेक मान्यवर साहित्यिक पदाधिकारी व साहित्यप्रमे यांनी या संमेलना सहभाग घेतला, मॉरिशस देशाचा दौरा केला होता. यावेळी मॉरिसचेस मधील मूळ भारतीय मराठी बांधवांनी आपल्या भारतीय भूमीबद्दल व मराठी संस्कृती बद्दल दाखवलेली ओढ भारत सरकार व मॉरिशस सरकार या दोन देशाचे संबंध अधिक दूर करणारी ठरली आहे. यावेळी मॉरिशस बांधवांनी साहित्य संमेलन सादर केलेले कलाविष्कार अफलातून होते. आता ते आपल्या कोकणभूमीत आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच येत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने मॉरिशस आणि कोकणचे एक वेगळे नाते यानिमित्ताने एक वेगळेच निर्माण होणार आहे. त्यामुळे या मॉरिशस टीमच्या च्या कला अविष्काराचा आनंद सिंधुदुर्ग वासीयाने अनुभवा असे आवाहन श्री मस्के यांनी केले आहे. पूर्व नियोजन बैठक या संदर्भात घेण्यात आली आहे. त्यामध्ये कार्यक्रम व स्वागत आदीसाठी समिती ही तयार करण्यात आली आहे. या बैठकीत रुजा रियो पिंटो, भरत गावडे, वृंदा कांबळी, विठ्ठल कदम, गुरु ताम्हणकर, सुरेश पवार, डॉक्टर एसटी आवटे, विजय पालकर, दीपक महाडदळकर, ऋतुजा केळकर, डॉक्टर दिपाली काजरेकर, उपस्थित होते.