सावंतवाडी: आसोली विकास मंडळ मुंबई यांच्या वतीने आसोली शाळा नंबर १ च्या शतक महोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी आसोली गावातील सर्व ग्रामस्थ आणि तरुण वर्गाने खूप उत्साहपूर्वक सहभाग घेतला. आसोली गावातील सर्व ग्रामस्थांनी तसेच आसोली विकास मंडळ मुंबई यांच्या सहयोगाने हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. या रक्तदान शिबिरामध्ये आसोली विकास मंडळ मुंबई चे पदाधिकारी, गावातील ग्रामस्थ, ग्रपंचायत सदस्य यांनी रक्तदान केले. यावेळी आसोली गावातील ग्रामस्थ व शतक महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केलेल्या व्यक्तींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.