Home स्टोरी सिंधुदुर्ग सहकारी बँक लि. मुंबईचा ६ मार्च रोजी रौप्य महोत्सव…!

सिंधुदुर्ग सहकारी बँक लि. मुंबईचा ६ मार्च रोजी रौप्य महोत्सव…!

179

मसुरे प्रतिनिधी: सिंधुदुर्ग सहकारी बँक लि.मुंबई बँकेला सन २०२३-२४ या कालावधीत २५ वर्ष होत आहेत. त्यानिमित्ताने रौप्य महोत्सव साजरा करण्याचे निश्चित केले आहे.बँक वाढीसाठी नविन जोमाने काम करण्यासाठी ०६ मार्च २०२४ रोजी, सायं. ५.३० वा. कोहिनूर हॉल, दादर सेंट्रल रेल्वे स्टेशन (पुर्व) येथे सहकार क्षेत्रातील नामवंताच्या उपस्थितीत बँकेचे हितचितंक, ठेवीदार, कर्जदार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार श्री. प्रविणभाऊ दरेकर अध्यक्ष, मुंबै बँक, आमदार श्री. प्रसादजी लाड संचालक, मुंबै बँक, श्री. दत्ताराम चाळके अध्यक्ष, व्यवस्थापन मंडळ अपना बँक, श्री. नितीन काळे जि.उ.नि. मुंबई शहर, श्री. शिवाजीराव नलावडे संचालक मुंबै बँक, श्री. संदिप घनदाट – संचालक, मुंबै बँक हे उपस्थित राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष हरिष बा. परब, उपाध्यक्ष जयवंत श्री. नरसाळे व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.