Home Uncategorized पक्ष कुठलाही असो,ज्याने चूक केली त्याची…देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा…

पक्ष कुठलाही असो,ज्याने चूक केली त्याची…देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा…

115

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राविषयी विचारलं असात त्यावर प्रतिक्रिया दिली आहे,
देशातील ९ विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रिय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच देश हुकुमशाहीच्या दिशेने जात असल्याची तक्रार केली. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (५ मार्च) अमरावतीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

 देवेंद्र फडणवीस म्हणाले, “यंत्रणांचा गैरवापर कुठेही होत नाही. मोदींच्या राज्यात ज्यांनी गैरमार्गाने पैसे कमावलेले आहेत, गैरकारभार-भ्रष्टाचार करत आहेत अशांना शिक्षा देण्याचं काम या यंत्रणा करत आहेत. त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही.”

“पत्र लिहून यातून कुणाचीही सुटका होणार नाही”

त्यामुळे असं कोणतंही पत्र लिहून यातून कुणाचीही सुटका होईल, असं मला वाटत नाही. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे हा भ्रष्टाचार त्यांनी बंद करावा,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.