Home स्टोरी मसदे स्वामी समर्थ मठ येथे २ व ३ मार्च रोजी मोफत अल्पोपहार...

मसदे स्वामी समर्थ मठ येथे २ व ३ मार्च रोजी मोफत अल्पोपहार व जेवण..!

155

मसुरे प्रतिनिधी: श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास रजि. संलग्न “श्री स्वामी समर्थ मठ- मसदे वडाचापाटया मठामध्ये श्री भराडी देवी आंगणेवाडी. यात्रेला येणाऱ्या भाविक, भक्तांसाठी श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास (रजि.) या संस्थेच्या वतीने श्री स्वामी समर्थ मठामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी २ व ३ मार्च २०२४ रोजी मोफत अल्पोपहार व जेवण देण्यात येणार आहे.सकाळी ७ ते ११ वा. पर्यंत चहा, नाष्ठा, दुपारी १२:३० ते ३ वा. पर्यंत जेवण (अन्नदान), सायं. ४ वा. पासून. चहा व अल्पआहार देण्यात येणार आहे.तरी भाविक भक्तांनी यांचा लाभ घ्यावा. अशी विनंती करण्यात आली आहे.