Home स्टोरी केशवसुत कट्टा येथे कै.अनिल परुळेकर यांच्या शोकसभेचे आयोजन

केशवसुत कट्टा येथे कै.अनिल परुळेकर यांच्या शोकसभेचे आयोजन

144

अनिल उर्फ आबा परुळेकर यांचे माठेवाडा येथे त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले. केशवसुत कट्ट्याचे सदस्य म्हणून ते सर्वांना सुपरिचित होते. शिक्षणाप्रती आस्था व लोकांना कायम सढळ हाताने मदत करण्याची वृत्ती असलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याची त्यांच्या कार्याची आठवण म्हणून उद्या रविवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता केशवसुत कट्टा येथे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, यांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी त्यांच्या ज्येष्ठ मित्र मंडळींनी व चहात्यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली द्यावी. रवी जाधव, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग