Home शिक्षण इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा आजपासून सुरु…!

इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा आजपासून सुरु…!

187

सावंतवाडी प्रतिनिधी: इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा आज २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. आज पहिला इंग्रजीचा पेपर विद्यार्थ्यांनी दिला आहे. २३ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे मुक्त वातावरणात आणि विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देता यावी यासाठी शिक्षण विभागाने परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना अगोदर अर्धा तास परीक्षेच्या वेळेपूर्वी उपस्थित राहून परीक्षा तणाव मुक्त देता यावी या दृष्टीने उपाययोजना केल्या आहेत.

सावंतवाडी तालुक्यात जवळपास २००० विद्यार्थ्यांनी आज बारावीच्या परीक्षेसाठी बसले आहेत. बारावी परीक्षा म्हणजे पुढील जीवनाची ही अमूल्य अशी रेषा आहे. त्यामुळे पालक विद्यार्थी शिक्षक या बारावी बोर्डाच्या परीक्षेत आपला विद्यार्थी यशस्वी व्हावा यासाठी शुभेच्छांचा वर्षाव सोशल मीडिया तसेच विद्यार्थ्यांना स्वतः भेटून आज सकाळपासून देण्यात येत होते. सावंतवाडी आरपीडी हायस्कूल तसेच पंचम खेमराज महाविद्यालय सांगली विद्यालय बांदा विद्यालय या ठिकाणी बारावी परीक्षा केंद्र आहेत.