Home स्टोरी बिळवस गांवामध्ये आमदार श्री. वैभव नाईक यांच्या माध्यमातून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण.

बिळवस गांवामध्ये आमदार श्री. वैभव नाईक यांच्या माध्यमातून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण.

274

मालवण: मालवण तालुक्यातील बिळवस गांवामध्ये, बिळवस कुंबळ ते भोगलेवाडी ग्रा.मा. २६९ या रस्त्याची कुंबळ तिठा ते सातेरी जलमंदिर पर्यंत अत्यंत दुर्दशा झालेली होती. या रस्त्यावरुन वाहन चालकांना वाहन चालवितांना अत्यंत कसरत करावी लागत होती. बिळवस येथील श्रीदेवी सातेरी जलमंदिर हे कोकणातील एकमेव पाण्यामध्ये असलेले मंदिर असल्याने तसेच धार्मिक व पर्यटनस्थळ म्हणुन प्रसिध्द असल्याने या रस्त्याने दररोज शेकडो भाविक-भक्तांची तसेच पर्यटकांची वाहने ये-जा करत होती. सदरच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बिळवस ग्रामस्थांची वारंवार मागणी होत होती. याबाबत कुडाळ-मालवण विधानसभेचे विद्यमान आमदार, श्री. वैभव नाईक यांनी सदर रस्त्याच्या कुंबळ तिठा ते बिळवस वरचावाडा पर्यंत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत तीन टप्प्यात दहा-दहा व पाच लाख असे मिळुण एकुण २५ लाख व टेंबवाडी-कोणीवाडी ते सातेरी जलमंदिरापर्यंतच्या भागाला मजबुतीकरण व डांबरीकरणाचे कामासाठी रुपये १९ लाख एवढा निधी मंजुर करुन दिल्याने रस्त्याच्या मजबुतीकरण, डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे बिळवस गांवातील ग्रामस्थ आमदार, श्री. वैभव नाईक यांचे आभार मानुन समाधान व्यक्त करीत आहेत. या कामासाठी मसुरे विभागाचे युवासेना प्रमुख श्री.राहुल सावंत व त्यांचे सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.