Home जाहिरात मेहनत करा, पण मार्क पाहू नका! शरद पवार यांचा मुलांना सल्ला..

मेहनत करा, पण मार्क पाहू नका! शरद पवार यांचा मुलांना सल्ला..

97

एका मुलाखतीत बोलताना शरद पवार यांनी मुलांना सल्ला दिला आहे. कमी मार्क मिळाले म्हणून चिंता करु नका. मेहनत करा, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.या मुलाखतीत बोलताना शरद पवार यांनी आपल्या जीवनातील अनेक पैलू उघड केले. मी कधी नापास झालो नाही. पण ३५ टक्क्यांच्या पुढेही गेलो नाही. नेहमी मार्ग काढण्याची मानसिकता ठेवली. संकटातून मार्ग काढण्याची मानसिकता असली की अपयश येत नाही. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात कष्ट करा. पण कमी मार्क मिळाले म्हणून चिंता करु नका. फार चांगले गुण मिळाले तो विद्यार्थी यशस्वी होतो, असे नाही. ३५ टक्के गुण मिळवणारा विद्यार्थीही यश मिळवतो हे मी अनुभवले आहे. म्हणून मेहनत करा, पण मार्क पाहू नका, असे शरद पवार यांनी सांगितले. क्रिकेटमध्ये कसे गेले, त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, माझे सासरे सदूराव शिंदे भारतीय संघातील खेळाडू. ते गुगली बॉलर होते. त्यामुळे माझ्या लग्नात अनेक क्रिकेटपटू आले होते. त्यानंतर या सर्व खेळाडूंशी जवळीक निर्माण झाली. मग मी गरवारे क्लबचा अध्यक्ष झालो. त्यावेळी क्लबमध्ये काहीवाद होते.ते मिटत नव्हते. हे वाद मिटवायचा प्रयत्न केला. गरवारे क्लबनंतर मुंबई क्रिकेटची निवडणूक लढवली. पुढे जाऊन भारतीय क्रिकेट मंडळ म्हणजे बीसीसीआयचा अध्यक्ष झालो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर मी क्रिकेटचा राजीनामा दिला. तेव्हापासून परत तिकडे पाहिले नाही, असे शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितले.