Home स्टोरी किल्ले सिंधुदुर्गवर आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा.

किल्ले सिंधुदुर्गवर आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा.

124

छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव शिवराजेश्वर मंदिराच्या नुतनीकरणानंतर प्रथमच शिवजयंती सोहळा.

सिंधुदुर्ग: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यभर साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेल्या किल्ल्यांपैकी सिंधुदुर्ग किल्ल्याला इतिहासामध्ये अत्यंत महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव असलेले शिवराजेश्वर मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून या शिवराजेश्वर मंदिराचे नूतनीकरण व छ.शिवाजी महाराजांच्या नवीन सिंहासनाचे बांधकाम करण्यात आले असून नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मंदिराच्या नुतनीकरणानंतर सिंधुदुर्ग किल्ला येथे शिवराजेश्वर मंदिरात प्रथमच शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुक काढत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते मूर्तीस जिरेटोप आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला. भगवे फेटे, भगवे झेंडे यामुळे किल्ले परिसर भगवामय झाला. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून उभारलेला भव्य भगवा ध्वज देखील साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

याप्रसंगी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, यतीन खोत, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, मंदार ओरसकर, नितीन वाळके, सन्मेष परब,वायरी सरपंच भगवान लुडबे, दीपा शिंदे, मनोज मोंडकर, महेंद्र म्हाडगूत, उमेश मांजरेकर, भाई कासवकर, यशवंत गावकर, हेमंत मोंडकर, वायरी ग्रा. प. सदस्य सौ. प्रभू, मीनाक्षी मेथर, आर्या गावकर, सिद्धेश मांजरेकर,किशोर गावकर,अक्षय भोसले आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.