Home स्टोरी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीतर्फे चौकुळ चिखलव्हाळ बेरडकीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप..!

रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीतर्फे चौकुळ चिखलव्हाळ बेरडकीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप..!

276

आंबोली: रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी तर्फे शनिवार,दि १७ फेब्रुवारी रोजी चौकूळ चिखलव्हाळ बेरडकी प्राथमिक शाळेतील विदयार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष सुहास सातोसकर, सचिव प्रविण परब, चौकुळ गावचे ग्रा. प. चे विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच गुलाबराव गावडे, चौकुळचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ भरत गावडे, शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत निर्मळ, अंगणवाडी सेविका श्रीम. दीपिका नाईक, बाबू नाईक, विलास नाईक आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

जगातील सर्वांत मोठ्या सामाजिक संस्था म्हणून नावारूपाप्रमाणे काम करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांच्याकडून अतिशय दुर्गम भागातील चौकूळ चिखलव्हाळ बेरडकी या प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांची दैनिक शैक्षणिक गरज ओळखून शालेय दप्तर सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले. त्याचबरोबर गोड खाऊ देण्यात आला. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांशी हितगुज करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरवातीला रोटरी क्लबच्या व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री सूर्यकांत निर्मळ सर यांनी शाळेतील उपक्रमांची माहिती दिली.
भरत गावडे यांनी सदरच्या बेरडकी वाडीतील रामोशी-बेरड जातीचा सामाजिक इतिहास व त्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक बाबी विषद केल्या.रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष श्री. सुहास सातोसकर यांनी मुलांना शिक्षणाची गरज सांगून शिकण्याची प्रेरणा दिली.

सचिव प्रवीण परब यांनी शाळेच्या अन्य गरजासाठी रोटरी क्लब सदैव पाठीशी असलेचा विश्वास प्रकट केला. चौकूळ ग्रा.प.चे विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच गुलाबराव गावडे यांनी शाळेच्या स्थापनेपासून ते आजअखेर चौकूळ गावातील सर्व शाळांसाठी चौकूळ ग्रामपंचायततर्फे केलेल्या कामगिरीचा आलेख विषद केला. चर्चेदरम्यान वाचन संस्कृतीचा उगम व विकास होऊन उत्तम नागरिक होण्यासाठी शाळेत सानेगुरुजी कथामालेचे आगामी काळात आयोजन करण्यासाठी सुचवण्यात आले.मुख्याध्यापक निर्मळ सरांनी ते मान्य केले विद्यार्थी देखील तयार झाले. त्यासाठी आवश्यक बाल वयोगटासाठी पुस्तकं पुरवण्याचे आश्वासन रोटरी क्लब मार्फत देण्यात आले.अंगणवाडी सेविका श्रीम दीपिका नाईक मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.रोटरी क्लबच्या या उपक्रमामुळे सर्व विद्यार्थी आनंदी झाले. त्यांच्यात शिक्षणाबद्दल सुयोग्य जाणीव जागृती व प्रेरणा मिळाली.