Home शिक्षण जेईई-मेन परीक्षेत कणकवलीच्या परेश मडवचे घवघवीत यश..!

जेईई-मेन परीक्षेत कणकवलीच्या परेश मडवचे घवघवीत यश..!

232

परफेक्ट अकॅडेमीसोबत करणार जेईई ॲडव्हान्सची तयारी…!

 

सावंतवाडी: आज जाहीर झालेल्या जेईई – मेन परीक्षा क्रमांक एकच्या रिझल्टमध्ये महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश मिळवले आहे. सिंधुदुर्गातून कु. परेश सतीश मडव या विद्यार्थ्याने 96.50% पर्सेंटाइल गुण घेत, भारतातील टॉप चार टक्के विद्यार्थ्यांमध्ये येण्याचा मान पटकावला आहे.

कुमार परेश हा कणकवली कॉलेजचा विद्यार्थी असून, जेईई-मेनच्या याच्यानंतर जेईई ॲडव्हान्ससाठी देखील कोकणातील अग्रगण्य अशी परफेक्ट अकॅडेमी त्याला मार्गदर्शन करत आहे. परेशचे वडील हे सेवानिवृत्त सेना अधिकारी आहेत. तर त्याचा मोठा भाऊ हा पुणे टिळक महाविद्यालय येथे बीएएमएस करत आहे. परेशने आपल्या यशाचे श्रेय आपल्या पालकांना आपल्या कुटुंबीयांना, तसेच आपल्या शिक्षकांना दिलं आहे.

तसेच परफेक्ट अकॅडेमीचे प्रा. राजाराम महादेव परब यांचा मौलिक सल्ला वेळोवेळी मिळाला, तसेच जेईई ॲडव्हान्समध्ये याहून चांगले यश मिळवण्याचा प्रयत्न राहील, असे त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले..