Home स्टोरी दिपक केसरकर भोगस शिक्षणमंत्री..! योगेश धुरी यांची खोचक टिका.

दिपक केसरकर भोगस शिक्षणमंत्री..! योगेश धुरी यांची खोचक टिका.

178

शिक्षणमंत्रीच बोगस म्हणजे शिक्षक भरती बोगसच होणार…! कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी 

कुडाळ: शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातील अनेक उमेदवार पोर्टल वरील माहिती भरण्यापासून वंचित,पवित्र पोर्टल वरची शिक्षक भरती बोगस होणार म्हणूनच युवासेनेचा आग्रह होता कि जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातून भरती घ्या अनेक स्थानिकांचा बेरोजगारी चा प्रश्नच मिटला असता. शिक्षण मंत्र्यांनी जिल्ह्यातील उमेदवारांवर इथे पण अन्याय केला आहे. जिल्हातील जास्त उमेदवारांची शिक्षक भरती होऊ नये यासाठी केसरकरांचा कट पूर्व नियोजित आहे. शिक्षणमंत्रीच बोगस म्हणजे शिक्षक भरती बोगसच होणारच. अशा खोचक शब्दात कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी शिक्षणमंत्री दिपक केसरकरांवर टिका केली आहे.

 

कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी पुढे म्हणाले की, शिक्षण मंत्र्यांनी जिल्ह्यातील उमेदवारांवर अन्याय करु नये, म्हणून युवासेना सातत्याने आग्रह धरत होती कि जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातुन भरती होऊ देत. हजारो रुपये फी भरून रजिस्ट्रेशन असतानाही पोर्टलवर माहिती भरण्यास येतात अनेकाना अडथळे येत आहेत. पोर्टलवर अनेकांना नॉट सेल्फ सर्टिफाय असे दाखवले जात आहे. सेल्फ सर्टिफाय करून स्थानिक उमेदवारांना शिक्षण मंत्री दीपक केसरकर जिल्ह्यातील उमेदवारांना न्याय देणार काय ? जिल्हा निवड मंडळाला शिक्षक भरतीचे अधिकार दिले पाहिजे होते आणि हे सरकार कायदे कुठे मानत, लोकांचे पक्ष स्वतःच्या नावावर करणाऱ्यांना पोर्टल प्रक्रिया रद्द करणे अशक्य नाही. आज शेवटची तारीख असल्याने शिक्षण मंत्री याकडे लक्ष देणार नाहीत स्वतःच्या जिल्ह्यातील उमेदवारांना पोर्टल पासून वंचित ठेवायचे हे पूर्व नियोजित आहे. जिल्ह्यातील सर्व उमेदवारांचे रजिस्ट्रेशन न झाल्यास सर्व उमेदवारांना घेऊन शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार.