चिंचवली प्रतिनिधी: इंग्रजी विषयाची भीती कमी होण्यासाठी वर्गाची सुरुवात शिक्षकांनी इंग्रजीतून करायला हवी. ‘ स्टार्ट युवर क्लास विथ अ सॉंग ‘ असे प्रतिपादन शेर्पे केंद्राचे टॅग समन्वयक तथा कुरंगवणे खैराट शाळेचे पदवीधर शिक्षक गोविंद वावदाने यांनी चिंचवली मधली शाळेत केले. टॅगची सुरुवात वेलकम सेरेमनीने झाली. त्यावेळी चिंचवली मधली शाळेच्या मुख्याध्यापिका प्रभा अकिवाटे यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व टॅगसाठी शुभेच्छा दिल्या. अनिल खोत यांनी प्रास्ताविक केले, तर अरुणा वाळवेकर यांनी आभार मानले. शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक व व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून सुरु असलेल्या संकेतस्थळाचा उपयोग करूनही शिक्षकांनी विविध आवश्यक इंग्रजी विषयक प्रशिक्षणे पूर्ण करुन आपले इंग्रजीचे ज्ञान अद्ययावत ठेवावे असे आवाहन करण्यात आले. इंग्रजी व्हिडीओ दाखवून त्यावर सामूहिक चर्चा झाली. पॉडकास्टचा वापर करुनही शिक्षकांनी इंग्रजीतील उच्चार समजून घ्यावेत. प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन करताना वर्गाची सुरुवात इंग्रजी कवितेने करावी असेही प्रतिपादन टॅग समन्वयक गोविंद वावदाने यांनी केले. टॅग मिटींगमध्ये झालेल्या चर्चेमध्ये सर्व टॅग शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
Home स्टोरी इंग्रजी विषयाची भीती कमी होण्यासाठी वर्गाची सुरुवात शिक्षकांनी इंग्रजीतून करायला हवी! पदवीधर...