Home स्टोरी तलाठी पदी निवड झालेल्या भगवान मानवरचा दांडी शाळेत सन्मान…!

तलाठी पदी निवड झालेल्या भगवान मानवरचा दांडी शाळेत सन्मान…!

241

मसुरे प्रतिनिधी: मालवण येथील दांडी शाळेचा माजी विद्यार्थी भगवान कुशाबा मानवर याने तलाठी स्पर्धा परीक्षेमध्ये खुल्या गटातून २०० गुण मिळवून जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. भगवानने मिळविलेल्या या यशाबद्दल दांडी शाळेमार्फत वरिष्ठ विस्तार अधिकारी उदय दीक्षित यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला.

 

यावेळी दांडी शाळा मुख्याध्यापक सौ.विशाखा चव्हाण, देवबाग केंद्रप्रमुख राजेंद्र परब, सौ.मनिषा ठाकुर, सौ.अमृता राणे, मालवण प्र.केंद्रप्रमुख तथा भगवानचे मार्गदर्शक शिक्षक शिवराज सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना भगवान मानवर याने जिद्द, चिकाटी, प्रयत्न आणि प्रचंड वाचन यामुळे मी हे यश मिळवू शकलो, असे सांगितले. सौ. चव्हाण, श्री. दीक्षित व शिवराज सावंत यांनी भगवानच्या या यशाबद्दल कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांनीही भगवानला शुभेच्छा दिल्या.