Home स्टोरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा वर्गावर सातत्याने अन्याय…! युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी  ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा वर्गावर सातत्याने अन्याय…! युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी         

125

साधं परीक्षा केंद्र जिल्ह्यात ठेवता येत नाही, जिल्ह्यातील मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

जिल्हा न्यायालय भरती परीक्षा केंद्र पुन्हा जिल्ह्याबाहेर, यादेखील भरतीत झोल होणार…! युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी 

        

सिंधुदुर्ग: युवासेना सातत्याने युवकांच्या बाजूने बाजू मांडत युवा वर्गावर होणाऱ्या अन्यायाना वाचा फोडतेय,तर सरकार सरकारमधील मंत्री,सरकारमधील आमदार तसेच भाजपा आणि मिंधे गट जिल्ह्यातील युवा वर्गावर सातत्याने अन्याय करत आहे. तलाठी भरतीत जिल्ह्यातील युवा वर्गावर अन्याय झाला,डीएड भरतीत जिल्ह्यातील डीएड धारकांवर अन्याय होणार हे निश्चितच आहे. शिक्षणमंत्री केसरकरांनी जिल्ह्यातील डीएड धारकांना देशोधडीला लावायचा विडा च घेतलाय. असं कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी म्हटलं आहे.

योगेश धुरी पुढे म्हणाले की, युवासेनेने गेल्या वेळी देखील भरती परीक्षा केंद्र जिल्ह्यात च राहावे यासाठी जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले होते, परंतु जिल्हाची एवढी अवस्था ह्या शासन कर्त्यांनी करून ठेवली आहे की अश्याप्रकारे युवकांना मनस्ताप,आर्थिक खर्चात घालून त्यांचे नुकसान करण्याची जबाबदारी येथील मंत्र्यांनी घेतली की काय? असा प्रश्न पडतो. जिल्हा न्यायालय भरती परीक्षा केंद्र प्रथम आवडीचे केंद्र सिंधुदुर्ग निवडून त्यांना कोल्हापूर,मुंबई अश्या ठिकाणी परीक्षा केंद्र दिलीत म्हणजे याभरतीत देखील जिल्ह्यातील ५ ते ६ जणच भरती होतील. बाकी सर्व जिल्हाबाहेरील होतील यात शंकाच नाही. असं  योगेश धुरी म्हणाले. तसेच ज्या पद्धतीने युवावर्गावर अन्याय हे भाजप मिंधे सरकार करत आहे मी जिल्ह्यातील सर्व तरुणांना विनंती करतो की ह्यांना मतदानात त्यांची जागा दाखवून द्यावी. असं आवाहन योगेश धुरी यांनी मतदारांना केलं आहे.

परीक्षा केंद्राबाबत खासदार विनायकजी राऊत साहेब,आमदार वैभवजी नाईक यांना विनंती करणार असल्याचे देखील युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.