Home शिक्षण पळसंब सुपुत्र तुकाराम साटम यांचे सिए परीक्षेत यश..!

पळसंब सुपुत्र तुकाराम साटम यांचे सिए परीक्षेत यश..!

147

मसुरे प्रतिनिधी: पळसंब खालचीवाडी येथील श्री तुकाराम अशोक साटम यांनी नोव्हेंबरमध्ये मुंबई येथे झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत यश प्राप्त केले आहे. पळसंब गावासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. शिक्षण क्षेत्रात पळसंब गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. साटम यांचे यश पळसंब गावातील मुला मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल. पळसंब गावातील उच्च शिक्षण घेऊ इच्छित असणाऱ्या मुलांसाठी शिक्षण क्षेत्रातील ते आदर्श ठरतील असे यावेळी साटम यांचे अभिनंदन करताना माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर म्हणाले. पळसंब गावातील मुलांच्या शिक्षणासाठी व शाळेसाठी आमचे सहकार्य राहिल असे मनोगत श्री.जयंतीदेवी सांस्कृतीक कला क्रिडा मंडळाचे आजीव सभासद श्री. दिगंबर साटम यांनी व्यक्त केले आहे.

पळसंब गावाच्या जडण घडणीत साटम परिवारात सिंहाचा वाटा असलेल्या श्री. तुकारात साटम हे गावी आल्यावर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. साटम यांच्या यशा बद्दल अभिनंदन होत आहे.