Home स्टोरी ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे व कै.नारायण शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने...

ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे व कै.नारायण शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन.

91

श्री माऊली क्लीनिकल लॅबोरेटरी वैभववाडी चे विशेष सहकार्य.

 

मसुरे प्रतिनिधि: ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे व कै.नारायण शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे मान्यवरांच्या शुभहस्ते उद्घाटन आरोग्य शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद.या आरोग्य शिबिरास महिलांच्या शरीरातील शुगर कॅल्शियम प्रोटीन अल्बमिन व पांढऱ्या पेशी तांबड्या पेशी प्लेटलेट यांसह इतर रक्त तपासण्या श्री माऊली क्लीनिकल लॅबोरेटरी वैभववाडी यांच्या विशेष सहकार्य करण्यात आल्या.यावेळी कै.नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शांताराम उर्फ बाळा गोसावी,ग्रामपंचायतचे सरपंच दीपक चव्हाण,उपसरपंच अनंत जंगम, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्या प्रियांका पाटील,ग्रामपंचायत सदस्या विशाखा काळे, निमअरुळे माजी सरपंच सविता कदम,महिला ग्रामस्थ सुनिता पवार, लक्ष्मी कोकरे,सुनंदा भोसले, अनिता अंगणे, प्रतीक्षा शेळके शुभांगी राणे,सुरेखा काळे, रवळनाथ देवस्थानाचे अध्यक्ष दत्ताराम रावराणे,आबाजी अंगणे ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत अशोक पाटील व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम स्थळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शांताराम उर्फ बाळा गोसावी यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी केले.