Home स्टोरी विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन व खाशाबा जाधव यांची जयंती उत्साहात...

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन व खाशाबा जाधव यांची जयंती उत्साहात साजरी…!

169

कणकवली प्रतिनिधी: महाराष्ट्राचे कुस्ती वीर खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित्त विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत क्रीडा दिन व शालेय वार्षिक क्रीडा महोत्सव बक्षिस वितरण समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिन आदरणीय वळंजू साहेब व मोटार वाहतून निरीक्षक अधिकारी सिंधुदुर्गचे वरिष्ठ अधिकारी आदरणीय ढोकळे साहेब व चव्हाण साहेब उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन प्रशालेचे वरिष्ठ क्रीडा शिक्षक श्री वणवे सर व पेडणेकर सरांनी केले. या कार्यक्रमाला भरघोष देणगी देवून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला त्या प्रशालेच्या माजी विद्यार्थीनी व मधुरा कॅम्पुटरच्या संचालिका सौ रश्मी बाईत मॅडम उपस्थित राहून विद्यार्थ्याचे कौतुक केले.

 

या प्रसंगी श्री ढोकळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा व वहातुकीचे नियम व कायदे या विषयी मार्गदर्शन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर यांनी कुस्ती रत्न खाशाबा जाधव यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा परिचय करून दिला. संस्थेचे सचिव आदरणीय वळंजू साहेब यांनी शालेय खेळातून सांघिक भावनांचा विकास होतो आणि शारिरीक ताकद वाढते यासाठी खेळ महत्वाचे असतात याविषयी मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वणवे सरांनी करून क्रीडा क्षेत्राची मौलिकता स्पष्ट केली. यावेळी प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौं. जाधव मॅडम ‘ सिंगनाथ सर ‘राणे सर , साटम मॅडम, सर्व शिक्षक व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.