Home स्टोरी केरी पेडणे न्यू इंग्लिश हायस्कूलच्या सं. कैकेयी नाटकाचे २२ रोजी नाणोस सिंधुदुर्गात...

केरी पेडणे न्यू इंग्लिश हायस्कूलच्या सं. कैकेयी नाटकाचे २२ रोजी नाणोस सिंधुदुर्गात सादरीकरण…!

272

सावंतवाडी: गोव्यातील केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कूल आणि केरी तेरेखोल शिक्षण संस्था संचालित गांधर्व महाविद्यालय परीक्षा केंद्र निर्मित ललिता बापट लिखित तीन अंकी ‘संगीत कैकेयी’ नाटक उद्या सोमवार दि २२ रोजी नाणोस – शिरोडा महाराष्ट्र येथे श्री वेतोबा मंदिर पटांगणावर संध्याकाळी ७ वाजता सादर होणार आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचा भाग म्हणून नाणोस येथे हा प्रयोग होणार आहे.

शालेय विद्यार्थ्यातर्फे सादर होणाऱ्या या नाट्यप्रयोगात समृद्धी सावंत,भार्गवी मठकर, साध्वी शेट्ये, सायली साटले, श्रेयल तळकर, तनिष्का सालगावकर, तेजल तळकर, प्रांजळ कोठावले, वेदिका नाईक, देवयानी हर्जी, महादेव तळकर, नियती मठकर, सर्वज्ञ् वस्त, वरद गाड, सान्वी काळोजी, भूमिका शेट्ये,, दिव्यांशु वस्त, ओम शेट्ये, आभार्थ शेट्ये, करणं राऊळ, अमृता शेट्ये, श्रिया शेट्ये, सान्वी सोपटे, किमया नागोजी, या बालकाकाराचा प्रमुख भूमिका असणार आहेत. तसेच नाटकचे दिग्दर्शक दिलीप रेडकर, सहायक दिग्दर्शक गुरुप्रसाद तांडेल, ऑर्गनसाथ यशवंत पेडणेकर, तबला यशवंत शेट्ये, पार्शवसंगीत रितेश भाटलेकर, साईश गाड, नेपथ्य व रंगमंच गुरुप्रसाद रंगमंच कासारपाल, केशभूषा रोशनी नाईक, ध्वनी संकलन सुहास जठार, निवेदक नवसो परब, तर सर्व शालेय कर्मचारी नाटकाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहेत.

 

केरी विद्याल्याने संगीत कैकेयी नाट्यप्रयोग या अगोदर केरी येथे भरलेल्या गोवा कला व संस्कृती खात्याच्या बाल संगीत संमेलनात सादर केला आहे. पहिल्या यशस्वी सादरीकरणानंतर नाणोस महाराष्ट्र येथे हा दुसरा प्रयोग होत आहे असे शाळेचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी कळविले आहे. नाट्यप्रयोगास मोठ्या प्रमाणात नाट्य रसिकानी उपस्थित रहावे, असे आवाहन शाळेचे चेअरमन व्रजेश केरकर व व्यावस्थापक शैलेंद्र कुबल यांनी केले आहे.

 

फोटो: 

केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कुल निर्मित संगीत कैकेयी नाटकातील बालकलाकार व व्यावस्थापक मंडळ.