Home स्टोरी शिवगर्जना प्रतिष्ठान चौकुळच्या वतीने शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३ रोजी भव्य सार्वजनिक...

शिवगर्जना प्रतिष्ठान चौकुळच्या वतीने शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३ रोजी भव्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन

235

सावंतवाडी वार्ताहर: शिवगर्जना प्रतिष्ठान चौकुळच्या वतीने शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३ रोजी भव्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

किल्ले पारगड

सर्व प्रथम सकाळी ५:०० वाजता किल्ले पारगड येथून शिवज्योत मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी ९:०० वाजता सर्व शिवभक्तांच्या उपस्थित शिवप्रतिमा पूजन करण्यात येणार आहे. सकाळी १०:०० वाजता सर्व लोकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी ११:०० वाजता शालेय विद्यार्थ्यांचे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी बारा वाजता शिवगर्जना प्रतिष्ठान चौकुळच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. असे वेगवेगळ्या कार्यक्रमांनी शिवजयंती उत्सव सोहळा साजरा होणार आहे. सर्व समाजातील शिवप्रेमींनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन शिवगर्जना प्रतिष्ठान चौकूळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.