Home स्टोरी कलंबिस्त ते शिराशिंगे रस्ता डांबरीकरण करण्यासाठी ग्रामस्थांचे बांधकाम कार्यकारी अभियंत्यांना निवेदन…!

कलंबिस्त ते शिराशिंगे रस्ता डांबरीकरण करण्यासाठी ग्रामस्थांचे बांधकाम कार्यकारी अभियंत्यांना निवेदन…!

116

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त ते शिराशिंगे पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. तो खडी करून डांबरीकरण करण्यात यावा. अशी मागणी कलंबिस्त ग्रामस्थांच्या वतीने व भाजप तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी यांच्याकडे निवेदन द्वारे केली आहे.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर, माजी सरपंच बाळू सावंत, अंतोन रॉड्रिक्स, संदेश बिडये, शरद पास्ते उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने अनिल सावंत, रमेश सावंत, प्रकाश सावंत, आदींच्या सहींचे निवेदन आहे. त्यामध्ये हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. येत्या २६ जानेवारी पर्यंत हा रस्ता डांबरीकरण न केल्यास आंदोलन करण्यात येईल. असे निवेदनात म्हटले आहे.