Home स्टोरी श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मळगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…!

श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मळगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…!

249

सावंतवाडी (मळगाव): बुधवार दि. १७ जानेवारी २०२४ पासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. तसेच २२ जानेवारी रोजी या मंदिराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा पार पडेल. तसेच अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठापन सोहळा उत्साहात संपन्न होणार आहे. या सोहळ्याची प्रतीक्षा सध्या भारतीयांना लागली आहे. त्यातच हा सोहळा “याची देही याची डोळा” पाहण्यासाठी अनेक रामभक्त उत्सुक आहेत. या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्या निमित्त देशभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावातील राम भक्तांच्या वतीने येथील भूतनाथ मंदिर येथे प्रभू ‘श्रीराम पूजन‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८.०० वाजता भूतनाथ मंदिरकडील रामाच्या पाषाणाचे पूजन कारण्यात येणार आहे. सकाळी ९.०० वाजता पूर्ण मळगावात ढोल ताशांच्या गजरात भक्तीमय शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर सामूहिक महाआरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. सर्व राम भक्तांनी या सोहळ्यात सहभागी होऊन सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.