Home शिक्षण महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण कार्यशाळा….!

महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण कार्यशाळा….!

181

शिरोडा: सत्यम कम्प्युटर अकॅडमी,शिरोडा या MKCLच्या MSCIT संगणक अध्ययन केंद्राच्या वतीने महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मकर संक्रांती(15 जानेवारी) ते जागतिक महिला दिन (8 मार्च) या कालावधीत प्रत्येक बॅचसाठी 8 दिवसांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या नियमानुसार नोंदणी केली जाणार असून कार्यशाळेची वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 6 पर्यंत असणार आहे.कार्यशाळेच्या शेवटी प्रत्येक रविवारी सहभागी महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.सदर कार्यशाळेत रोजच्या जीवनात वापरले जाणारी डिजिटल सिटीझनशिप स्किल्स, कंप्यूटर आणि स्मार्टफोन स्किल्स,डेअली लाइफ स्किल्स, मुलांसाठी उपयोगी स्टडी स्किल्स,सोशल मीडिया स्किल्स,सायबर सिक्युरिटी स्किल्स,विविध नित्योपयोगी ॲप्सचा वापर,ऑनलाइन माहिती इत्यादी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.तरी जास्तीत जास्त महिलांनी या मोफत संगणक कार्यशाळेत सहभागी होऊन संगणक प्रशिक्षित व्हावे असे आवाहन केंद्र संचालक श्री. अविनाश रायशिरोडकर यांनी केले आहे.नोंदणीसाठी सत्यम ऑफिस 02366-227098 ,कु.मयुरी धुरी-9145767797, सौ.निधी परब -9673686629 सौ.विश्रांती परब-7517047584 यांच्याशी संपर्क साधावा.