पडवे गावात भाजपला धक्का: भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.
सिंधुदुर्ग: महाराष्ट्रातील जनतेची लढाई आता महाराष्ट्र विरोधकांशी आहे. महाराष्ट्र विरोधकांकडून मराठी माणसाला संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेना पक्ष मराठी माणसाच्या पाठीशी राहत असल्यानेच शिवसेनेत फूट पाडण्यात आली.मुंबई बरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही परप्रांतीय लोकांची संघटना काढण्यापर्यंत भाजपची मजल गेली आहे. राज्यातील वेदांता फॉक्सकॉन, मरीन अकॅडमी, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिवाईस पार्क ,टाटा एअरबस, महानंदा दूध प्रकल्प, हिऱ्याची कंपनी, जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प असे अनेक प्रकल्प गुजरातला पळविण्यात आले. १०५ हुताम्यांनी जीव देऊन मुंबई आणि महाराष्ट्र घडला आहे. त्यामुळे गुजरात्यांपासून महाराष्ट्र वाचविण्यासाठी उद्धवजी ठाकरेंना साथ द्या असे आवाहन आ. वैभव नाईक यांनी पडवे येथे केले.
पडवे गावातील भाजप पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.
यामध्ये भाजपचे बूथ प्रमुख प्रभाकर परब, माजी ग्रा. प. सदस्य संतोष लाड, सोनू परब, संदेश अपराध, आनंद परब, माजी पोलीस पाटील मधुकर परब, प्रमोद परब,अशोक पडवेकर, मंदार चव्हाण, परशुराम शिरवंडकर, पंकज शिरवंडकर, गोपाळ परब, प्रवीण शिरवंडकर, शिवा कोळंबकर,संजय कोळंबकर, वेदान सावंत, प्रथमेश सावंत, संतोष परब, दीपक परब, सुनील परब, ज्ञानदेव पारकर, मोहन गवस, सचिन नाईक, बबन सावंत, पांडुरंग गावडे, सुनील परब,सदानंद कोळंबकर,चंद्रकांत लोहार यांसह अन्य भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
यावेळी शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे,उपतालुका प्रमुख सचिन कदम, उपतालुका प्रमुख बाळा कोरगावकर, विभाग प्रमुख नागेश ओरोसकर, छोटू पारकर,दीपक आंगणे,अमित भोगेले, बाळू पालव,सुनील जाधव,सुशील निब्रे,राजू घाडी, पडवे शाखा प्रमुख संतोष शिरवंडकर, उपशाखा प्रमुख प्रशांत परब, योगेश तावडे,कृष्णा गावडे, श्री. वेंगुर्लेकर,नाना नाडकर्णी,बबन तारापूरे,विजय परब,बुधाजी परब,संतोष सावंत,कृष्णा सावंत आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.