Home स्टोरी ५१ व्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला आ. वैभव नाईक यांची उपस्थिती..!

५१ व्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला आ. वैभव नाईक यांची उपस्थिती..!

79

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजन…!

सिंधुदुर्ग: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागाच्या वतीने ५१ वे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कुडाळ तालुक्यातील शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर तिठा येथे आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शन सोहळ्याला आमदार वैभव नाईक यांनी उपस्थिती दर्शविली. तसेच विज्ञान प्रदर्शनातील प्रतिकृतींची पाहणी केली. या कार्यक्रमादरम्यान निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन प्रतिकृती अशा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यात विजयी स्पर्धकांना आ. वैभव नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

यावेळी जि. प. शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ गावडे, सचिव नागेंद्र परब, मुख्याध्यापक संजय मालवणकर, पर्यवेक्षक मिलिंद कर्पे, श्री. मेंगानी, श्रीम अवटे, एस. डी. गावकर,आदींसह अधिकारी, शिक्षक, व विद्यार्थी उपस्थित होते.