कोल्हापूर प्रतिनिधी: कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणास गांवांतर्गत विकास कामांसाठी रुपये २ हजार कोटी निधी खास बाब म्हणून मंजूर करणेत यावा अशी मागणी करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या निवेदनात मजकूर असा की महाराष्ट्र प्रादेशिक व नरगरचना अधिनियम १९६६ च्या कलम ४२ (ऐ) अनुसार कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील ३७ व हातकणंगले तालुक्यातील ५ गांवे अशा एकुण ४२ गांवासाठी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण घोषीत करण्यात आले.
कलम ४२ (सी) प्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाकडील दि. १६ -८-२०१७ रोजीच्या अधिसुचनेनुसार कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास गठीत केले आहे. परंतु क्षेत्रातील पायाभुत सुविधा व विकास कामे याबाबत शासनाने निधीची कोणतीही तरतुद आज अखेर केलेली दिसत नाही. शहरांतर्गत विकासकामे होत नसल्यामूळे *पुन्हा एकदा कोल्हापूर शहर हद्दवाढीची मागणी जोर धरत आहे. परंतु त्याला सभोवतालच्या मोठया लोकसंख्येच्या गावातून तीव्र विरोध होत आहे.
याकरीता कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण ही सेल्फ सपोर्टींग बॉडी असलेने त्यांनी स्वनिधी तयार करुन विकास करणेचा आहे. परंतु कोल्हापूर क्षेत्र प्राधिकरण परिसरातील प्राधिकरणाकरीता स्व:निधी उपलब्ध करु शकणारे स्त्रोत मर्यादीत असलेने जमा होणाऱ्या स्वनिधीतून प्राधिकरणातील ४२ गांवातील पायाभुत सुविधा व विकास कामे करणे अशक्यप्राय आहे. म्हणून कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणास २ हजार कोटीचा निधी खास बाब म्हणून अटी व शर्ती सहीत देणे आवश्यक आहे. असे निवेदनात म्हटले आहे. याबाबत तात्काळ संबंधितांना बैठक लावणेत यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.