Home स्टोरी मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये बालिका दिवस साजरा…!

मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये बालिका दिवस साजरा…!

190

सावंतवाडी: मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रीचर्ड सालदान्हा यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.व सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आपले विचार व्यक्त केले.तसेच प्रशालेची विद्यार्थिनी कु.वेदांगी पटवर्धन हिने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या शिक्षिका सौ.शारदा गावडे यांनी केले.यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.