Home स्टोरी सुधीर प्रभूआजगांवकर यांचे दातृत्व.! आजगाव ग्रंथालयास केली आर्थिक मदत.

सुधीर प्रभूआजगांवकर यांचे दातृत्व.! आजगाव ग्रंथालयास केली आर्थिक मदत.

124

सावंतवाडी: तालुक्यातील मूळ आजगाव गांवचे सुपुत्र व मुंबई स्थित श्री. सुधीर रघुनाथ प्रभूआजगांवकर यांनी मोठं दातृत्व दाखवत समाजात सामाजिक बांधिलकीने एक नवा आदर्श उभा केला आहे. श्री. प्रभूआजगावकर यांनी मराठी ग्रंथालय , आजगांवला संगणक संच व फर्निचरसाठी रोख रु. 40000/- ची आर्थिक मदत केली असून त्यांच्या या दानशूरपणाचे आजगाव ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. येथील माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र उर्फ अण्णा झांट्ये यांनी सुधीर प्रभूआजगावकर यांचे विशेष आभार मानून समाजातील इतरांनीही त्यांचा आदर्श जपावा, असे आवाहन केले आहे.