Home स्टोरी मूलभूत कलागुणांचा विकासच महत्वाचा..! कवी अजय कांडर यांचे कणकवली फ्लोरेट कॉलेज इंटिरियर...

मूलभूत कलागुणांचा विकासच महत्वाचा..! कवी अजय कांडर यांचे कणकवली फ्लोरेट कॉलेज इंटिरियर अँड फॅशन डिझायनिंगच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात प्रतिपादन

110

फॅशन शो – नृत्य – गाणी यांनी दणाणले सभागृह..

कणकवली प्रतिनिधी: विद्यार्थीदशेत मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला तर भविष्य त्यांचं उज्वल असतं. माणसांचा मूलभूत कला विकास महत्त्वाचा असून त्या कलागुणांच्या विकासावर कलावंत जागतिक पातळीवर यश मिळू शकतो. यासाठी मात्र जिद्द – परिश्रम आणि आपल्यातील कलागुणांचे मोल कळायला हवे तरच मोठे यश मिळू शकते. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी कणकवली येथे केले.

कणकवली फ्लोरेट कॉलेज इंटिरियर अँड फॅशन डिझायनिंगचा वार्षिक स्नेहमेळावा कवी अजय कांडर यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली निलायम ब्लू थिएटरच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना कवी कांडर यांनी फॅशन डिझाईन या क्षेत्रामध्ये मोठ्या संधी असून आता खेडेगावांमधूनही या क्षेत्रामध्ये मोठी प्रगती करता येते. मात्र यासाठी आपल्यातील संकोचितपणा सोडायला हवा. कोणत्याही धाडसानेच जग जिंकता येते. ही जिद्द नव्या पिढीने बाळगली पाहिजे तरच मोठे यश शक्य आहे. असेही आग्रहाने सांगितले. यावेळी संस्थेचे प्रमुख किशोर कदम, अमर पवार, रितू रॉय, सार्था कदम, नेहा कदम, पराग आरोलकर, साक्षी खोपटकर, ऋतुजा नेरुळकर, अक्षय येडवे, आर्या कदम आदी उपस्थित होते.

किशोर कदम म्हणाले, सिंधुदुर्ग सारख्या ग्रामीण भागातील मुलांना फॅशन डिझाईन क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी कणकवली येथे सदर कॉलेज सुरू करण्यात आले आहे. या कॉलेजच्या शाखा मुंबई, पुणे सातारा आदी भागात सुरू आहेत. तज्ञ मार्गदर्शक हे या कॉलेजचे वैशिष्ट्य आहे.आज मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दरवर्षी असा कार्यक्रम आयोजित केला जाईल आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली जाईल.

अमर पवार म्हणाले, कणकवली सारख्या तालुका शहरात फॅशन डिझाईन कॉलेज सुरू झालं ही मोठी उपलब्ध संधी आहे. आता शहरासारखंच शिक्षण ग्रामीण भागातही मिळत आहे. मात्र मुलांनी याची संधी घ्यायला हवी. तरच पुढे जाता येईल.

यावेळी विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर झाले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांबरोबरच मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता. सूत्रसंचालन अक्षयी एडवे यांनी केले तर आभार सार्था कदम यांनी मानले.