Home स्टोरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या निषेधार्थ कुडाळ युवासेना आक्रमक….!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या निषेधार्थ कुडाळ युवासेना आक्रमक….!

239

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या निषेधार्थ कुडाळ तालुक्यातील प्रत्येक कॉलेजच्या बाहेर तसेच कुडाळ बस स्थानकाच्या बाहेर सह्यांची मोहीम घेणार…! युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी.

आमदार वैभवजी नाईक आणि युवासेना कोकण सचिव तथा युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार कार्यक्रम.

कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी.

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी पर्यटन प्रकल्प गुजरात मध्ये गेला, येथील स्थानिक सत्तेतील मंत्री मात्र चडीचूप आहेत, केंद्रीय मंत्री राणे तसेच शिवसेनेवर तोंडसुख घेणारे राणेंचे दोन्ही पुत्र आणि भाजप पदाधिकारी यावर काहीही बोलत नाही आहेत आणि अशाप्रकारे प्रकल्प जाणे हे सत्तेतील लोकांचे भाजप च्या स्थानिक नेत्यांचे अपयश आहे.

 

मात्र युवासेना गप्प बसणार नाही. यावर आवाज उठवणार युवासेना तसेच कॉलेज कक्ष च्या माध्यमातून हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या निषेधार्थ प्रत्येक कॉलेजच्या बाहेर सह्यांची मोहीम हाती घेईल. तसेच कुडाळ बस स्थानकाच्या बाहेर सह्यांची मोहीम घेणार असे युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे यावेळी युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी युवासेना तालुका समन्वयक योगेश तावडे, युवासेना कुडाळ शहर प्रमुख संदिप म्हाडेश्वर, युवासेना कुडाळ शहर संघटक अमित राणे,युवासेना उपतालुकप्रमुख सागर भोगटे, विनय गावडे, स्वनिल शिंदे, युवासेना उपशहरप्रमुख रुपेश कांबळी आदि उपस्थित होते.