Home Uncategorized सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आयोजित नववर्षाच्या स्वागतासाठी बेधुंद २०२४  ऑर्केस्ट्रा व विविध कार्यक्रमांचे...

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आयोजित नववर्षाच्या स्वागतासाठी बेधुंद २०२४  ऑर्केस्ट्रा व विविध कार्यक्रमांचे आयोजन…!

192

सावंतवाडी प्रतिनिधी: सांस्कृतिक पर्यटन महोत्सवास आपण भरभरून प्रतिसाद देत आहात.. दिनांक २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत सुरू असलेला हा महोत्सव त्यातील विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ स्टॉल्स यांवर असलेली प्रचंड गर्दी पाहता आपला नागरिकांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी आम्ही सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग च्या वतीने हा पर्यटन मिनी महोत्सव १ जानेवारी २०२४ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी सावंवाडीतील या सांस्कृतिक मिनी महोत्सवात आपण नवीन वर्ष जल्लोष कार्यक्रम सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ने आयोजित केले आहे. बेधुंद २०२४ ( गीत, नृत्य, मिमिक्री असा महाराष्ट्रा व गोव्यातील नावजेल्या गायक वादक आणि डान्सर)असा जल्लोष कार्यक्रम करणार आहोत..सोबतच आपण सावंतवाडी तालुका मर्यादित फक्त दहा स्पर्धकांसाठी बेस्ट कपल २०२४ (नवरा बायको) ही स्पर्धा घेणार आहोत..तरी आपणा सर्व सावंतवाडीकर, रसिक, पर्यटक यांनी या १ जानेवारी रोजी या मिनी महोस्तव ठिकाणी भेट देऊन नवीन वर्ष जल्लोष कार्यक्रम मध्ये सहभागी व्हावं ही विनंती. विजेत्या  बेस्ट कपल २०२४  साठी आकर्षक ट्रॉफी आणि गिफ्ट voucher देण्यात येतील.  बेस्ट कपल २०२४ स्पर्धेत नाव नोंदणीसाठी रवी जाधव व शरद पेडणेकर यांच्याशी आजच संपर्क करा. नियम व अटी लागू.

संपर्क: – रवी जाधव 9405264027 आणि शरद पेडणेकर 9356883693