Home स्टोरी सिंधुदुर्गातील दोन सुपुत्रांना कृषी क्षेत्रातील संशोधनाबद्दल मानद डॉक्टरेट.!

सिंधुदुर्गातील दोन सुपुत्रांना कृषी क्षेत्रातील संशोधनाबद्दल मानद डॉक्टरेट.!

889

सावंतवाडी: मालवण कुंभारमाठचे सुपुत्र, आदर्श शेतकरी उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांना मागील तीन वर्षातील हापूस आंब्यांचे प्रथम उत्पादन घेण्याच्या कार्याबद्दल आणि संशोधनबद्दल नोव्हेंबर महिन्यात जाहीर झालेली कृषी क्षेत्रातील मानद डॉक्टरेट 28 डिसेंबरला दिल्लीत ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर ‘येथे कुलगुरू, कुलसचिव, कृषी उच्चायुक्त आणि अंबासि इकॉनॉमिक चान्सलर यांच्या हस्ते गोल्ड मेडल, ऑर्डरसहित डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.

तसेच वेंगुर्ला आडेलीचे सुपुत्र अनंत दिगंबर आजगांवकर यांनी लाल भेंडीमध्ये संशोधन करून ब्राऊन, पिस्ता, वेलवेट रेड या जाती निर्माण केल्या. त्यांचे अखिल भारतीय पातळीवर चाचणी होऊन त्याचे अधिकार आजगावकर यांना प्रदान करून त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. महाराष्ट्रात कृषी क्षेत्रातील पहिली डॉक्टरेट अहमदनगरचे आदर्श सरपंच डॉ. पोपटराव पवार यांना गेल्या वर्षी प्रदान करण्यात आली. त्यानंतर या सिंधुदुर्गातील दोन सुपुत्रांना अशा प्रकारची दुर्मिळ डॉक्टरेट मिळाली आहे. त्यांचे जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत यांनी अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल डॉक्टर उत्तम फोंडेकर आणि डॉक्टर आजगांवकर यांचे विमानतळावर उतरून वेंगुर्ल्यात आल्यावर दोघांची भटवाडी ते खर्डेकर कॉलेज पर्यंत वेंगुर्लावासियांनी जंगी मिरवणूक काढली.